Shivsena-shinde protest saam tv
मुंबई/पुणे

Deenanath Mangeshkar Hospital: गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण; शिवसेना आक्रमक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राडा

Maharashtra Politics: पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णालयाबाहेर ठाकरे-शिंदे सेनेचं आंदोलन सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून, उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होत्या, तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत. याच प्रकरणामुळे आता शिवसेना आक्रमक होऊन रुग्णालयाबाहेर राडा सुरु आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर येऊन राडा सुरु आहे. शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर पैसे फेकले. रुग्णालय प्रशासनाला भेटण्याची त्यांच्याकडून मागणी केली जाते मात्र पोलिसांनी गेटवर अडवल्यामुळे गोंधळ सुरू आहे. बाहेर येऊन या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली अशा प्रकारचा निरोप पोलिसांकडून देण्यात आला.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती गठीत केले. समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केले असल्याची माहिती आहे. दीनानाथ मंगेशकर यांना योग्यरिते अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत. समितीचे सदस्य आणि अध्यक्ष स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करणार आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच, राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमण्याची घोषणा केली असून रुग्णसेवेतील पारदर्शकतेवर भर दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT