Shirur Taluka Pabal Village News Saam TV
मुंबई/पुणे

Shirur News : क्रिकेट खेळताना घडलं भयंकर, बॉल काढताच 12 वर्षीय मुलाचा गेला जीव; शिरुर तालुक्यातील घटना

Shirur Taluka Latest News : क्रिकेट खेळताना पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील पाबळ गावात घडली.

Satish Daud

क्रिकेट खेळताना पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील पाबळ गावात रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. हर्षल पिंगळे असं मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेनं संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हर्षल आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. यावेळी बॉल उडून एका घरावरील पत्र्यावर गेला. तेव्हा हर्षल हा बॉल काढण्यासाठी पत्र्यावर चढला.

दरम्यान, बॉल घेऊन खाली उतरत असताना घरावरुन गेलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्ष झाला. त्यामुळे हर्षलला विजेचा जोरदार धक्का बसला. आरडाओरड होताच गावातील नागरिक धावत आले. त्यांनी लाकडी काठीने हर्षलला बाजूला तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत हर्षलचे वडील संतोष चंदर पिंगळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली.पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. हर्षल हा अतिशय हुशार आणि देखणा मुलगा होता. त्याच्या अचानक मृत्यूने पिंगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT