uddhav thackeray and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

'निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही'; उद्धव ठाकरेंचा 'तो' जुना व्हिडिओ शेअर करत शिंदे गटाने साधला निशाणा

शिंदे गटाचे प्रवक्ते ,माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एक जुना व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

Maharashtra Political News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या राजकीय संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले आहेत. याचदरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते ,माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एक जुना व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीपण्णी सुरू केली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून झालेला वाद कोर्टात पोहोचला.

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने दिला. त्यामुळे ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी केली आहे. तर शिंदे गटाने मुंबईच्या बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणे देखील सुरु केले आहे.

शिंदे गटाने 'निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही' या थीम अंतर्गत सोशल मिडियावर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरू केले आहे. दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे एक जुने भाषण सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मिश्किलपणे केलेली टीका यामध्ये दाखवण्यात आली आहे. तसेच 'विसर न व्हावा' असे कॅप्शन देखील देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : उपवासाच्या दिवशी किती कप चहा प्यावा? जाणून घ्या योग्य प्रमाण

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'हे' काम अन्यथा २००० रूपये मिळणार नाहीत, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये भर पावसात महामोर्चा

Gen Z इतरांपेक्षा वेगळे का आहेत? जाणून घ्या कारणे

Maharashtra Weather : आषाढी एकादशीला वरुणराजा बरसणार का? ४ दिवसाचा अंदाज आला समोर, IMD चा अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?

SCROLL FOR NEXT