Eknath Shinde and Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची 'तारीख पे तारीख'; आता निघाला 'हा' नवा मुहूर्त

आज शिंदे-फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी कोणतीही विशेष बैठक झाली नाही. त्यानंतर आता शिंदे सरकारच्या मत्रिमंडळ विस्ताराची नवीन तारिख समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या संभ्याव शपथविधीची ११ जुलै ही तारिख समोर आली होती. मात्र, आज शिंदे-फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी कोणतीही विशेष बैठक झाली नाही. त्यानंतर आता शिंदे सरकारच्या मत्रिमंडळ विस्ताराची नवीन तारिख समोर आली आहे. ( Maharashtra Cabinet Expansion News In Marathi )

राज्यात शिंदे सरकार येऊन आता जवळपास ११ दिवस उलटले आहेत. मागील ११ दिवसांत अनेक तारखा मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा समोर आल्या आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे काही नाव घेईना. आता पुन्हा एक तारीख समोर आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार एक तर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत आल्यानंतर होईल किंवा १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या तारखांपैकी एका तारखेला तरी विस्तार होणार का, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

सगळयात महत्वाचे म्हणजे विस्ताराच्या वेगवेगळ्या येणाऱ्या तारखांनी मात्र इच्छुकांची चिंता चांगलीच वाढली आहे. आधीच मंत्रीपद मिळेल म्हणून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, विस्ताराची नेमकी तारीख निश्चित होत नसल्याने शिंदे गट आणि भाजपचे इच्छुक मात्र पुरते अस्वस्थ झालेत. लवकरात लवकर विस्तार व्हावा आणि आपल्या गळ्यात एकदा मंत्रिपदाची माळ पडावी अशीच काहीशी अवस्था काहींची झाली आहे. त्यामुळे आषाढी झाल्यानंतर तरी आपल्याला पांडुरंग पावेल असे काहीना वाटत आहे. आता हा मंत्रिमंडळ विस्तार नव्याने आलेल्या तारखांना तरी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT