Crime: शिळ-डायघर पोलीसांकडून जबरी चोरी करणारा सराईत चोर अटकेत प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Crime: शिळ-डायघर पोलीसांकडून जबरी चोरी करणारा सराईत चोर अटकेत

शिळ डायघर पोलीसांनी जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला केली आहे.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

दिवा : शिळ डायघर पोलीसांनी जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला केली आहे. राकेश भुलन यादव (वय २२) असे या चोरट्याचे नाव असून याच्याकडून १,११,५०० किमतीचे २० विविध कंपनीचे मोबाईल आणि एक मोटारसायकल सुद्धा जप्त केली आहे. (Crime News)

शिळ डायघर पोलीस हद्दीतील शिळफाटा येथे एक इसम चोरीचा मोबाईल विकण्याकरीता येणार असल्याची माहिती स.पो.नि भूषण कापडणीस यांना मिळाली आणि मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस अंमलदारांसह शिळफाटा येथे दोन पंचांसह सापळा रचून थांबले.

काही वेळाने एक तरुण निळया रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या सुझुकी कंपनीच्या एक्सेस मोटार सायकलवरून शिळफाटा येथील शिवसेना शाखे जवळील पानटपरीजवळ आला. गुप्त बातमीदाराने केलेल्या इशाऱ्यानुसार पोलिसांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफिने ताब्यात घेतले. राकेश भुलन यादव असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडे एक ओप्पो (Oppo) कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल सापडला.

मोबाईलच्या आय.एम.ई.आय. नंबरवरून पोलीसांनी मोबाईलच्या मालकाचा शोध घेतला असता असे समजेल की, ता. ०३ डिसेंबर रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास कामावर जात असताना दहिसर नाका येथे एका मोटार सायकलवरून आलेल्या दोन इसमापैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातील मोबईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, चोरटा राकेश भुलन यादव यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) अधिक तपास केला असता चोरटा राकेश याने आपल्या साथीदारासह चोरीचे गुन्हे केल्याचे उघडली झाले असून त्याच्याविरूध्द एकूण ५ ठिकाणी ७ जबरी चोरीचे व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Dombivali News In Marathi)

हे देखील पहा-

त्याच्याकडून १,११,५०० रुपये किमतीचे २० विविध कंपनीचे मोबाईल व त्याने गुन्ह्यात वापरलेली ५०,००० किमतीची सुझुकी कंपनीची एक्सेस मोटार सायकल असा एकूण १,६१,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान सदर गुन्हा उघण्यासाठी स.पो.नि. कापडणीस, हेमंत भामरे, गोविंद पाटील, राकेश सत्रे, सचिन कोळी, सुशांत पाटील,कृष्णा बोराडे, महेंद्र बरफ, राजेंद्र सोनवणे, अक्षय पाडळे यांनी तपास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT