shelarwadi villagers aggressive on rail board begdewadi station  saam tv
मुंबई/पुणे

Begdewadi Station : शेलारवाडी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, रेल्वे प्रशासन नमले; आंदाेलन तूर्तास स्थगित

यामुळे ग्रामस्थांनी यार्डातील सुरू असलेले काम बंद करण्याचा इशारा दिला. तसेच ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाने नेमून दिलेल्या संबंधित कामाच्या ठेकेदाराला जाब विचारला.

दिलीप कांबळे

Lonavala :

शेलारवाडी रेल्वे यार्ड येथे येथून पुढे रेल्वे संबंधितचा कचरा जाळणार नाही असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने शेलारवाडी ग्रामस्थांना दिले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे होत असलेल्या धुराच्या त्रासातून शेलारवाडी ग्रामस्थांना मुक्ती मिळेल अशी आशा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे लोणावळा लोहमार्गवरील बेगडेवाडी स्टेशन दरम्यान असणाऱ्या शेलारवाडी येथे देशभरातील जुन्या रेल्वे गाड्यांचे डबे जे वापरात नाहीत त्यांची विल्हेवाट या रेल्वे यार्डात केली जाते. रेल्वे डब्यांच्या आत असणारे फोम, किंवा इतर तत्सम साहित्य जाळून विल्हेवाट केली जाते. यामुळे आगीच्या धुराने शेलारवाडी ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. (Maharashtra News)

यामुळे ग्रामस्थांनी यार्डातील सुरू असलेले काम बंद करण्याचा इशारा दिला. तसेच ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाने नेमून दिलेल्या संबंधित कामाच्या ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांचा रोष पाहून पुढील काळात या परिसरा कचरा जाळला जाणार नाही असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले. या निर्णयामुळे अनेक वर्षे होत असलेल्या धुराच्या त्रासातूना ग्रामस्थांना मुक्ती मिळेल अशी आशा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

SCROLL FOR NEXT