Sheena Bora murder case Supreme Court granting bail to Indrani Mukherjea (file Photo) SAAM TV
मुंबई/पुणे

Indrani Mukherjea Bail: शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला अखेर जामीन

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. शीनाच्या हत्या प्रकरणात इंद्राणी मुख्य आरोपी आहे.

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी मुखर्जीच्या (Indrani Mukherjea Bail) जामीन अर्जावर हा निर्णय देण्यात आला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी हा जामीन मिळाला असून, साडेसहा वर्ष हा तुरूंगवासाचा कालावधी मोठा असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. याशिवाय इंद्राणी मुखर्जीने एकदाही पॅरोलची रजा घेतली नसल्याची बाब इंद्राणीचे वकील रोहतगी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर कोर्टानं तिचा जामीन मंजूर केला. शीना बोरा हिची २०१२ मध्ये हत्या झाली होती. २०१५ साली या प्रकरणाचा उलगडा झाला होता. चौकशी दरम्यान इंद्राणी मुखर्जीने शीना बोराच्या हत्येची कबुली दिली होती. सध्या इंद्राणी मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात आहे. (Sheena Bora murder case Supreme Court granting bail to Indrani Mukherjea)

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं इंद्राणीला जामीन मंजूर केला आहे. सुनावणीवेळी इंद्राणी मुखर्जीकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. आरोपी इंद्राणीला कलम ४३७ अंतर्गत विशेष सवलतीचा अधिकार आहे. ती बराच काळ तुरुंगात आहे. इतकेच नाही तर, गेल्या ११ महिन्यांपासून सुनावणी पुढे सरकू शकली नाही, असे रोहतगी म्हणाले.

सीबीआयच्या विशेष कोर्टाच्या कोठडीत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सुप्रीम कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी तिला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळू शकला नव्हता. इंद्राणी ही २०१५ साली अटकेत असून, तेव्हापासून ती भायखळा येथील महिला कारागृहात आहे. विशेष सीबीआय कोर्टाने इंद्राणीला जामीन देण्यास नकार दिला होता. शीना बोराच्या हत्येच्या आरोपाखाली इंद्राणीवर खटला सुरू आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

Asia Cup 2025: टीम इंडियातील किती खेळाडूंचे लग्न झाले तर किती अविवाहित?

Manoj Jarange: गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मुंबईत मनोज जरांगे गरजले

SCROLL FOR NEXT