Nilesh Chavhan Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात, खोटा पत्ता दिल्यामुळे गुन्हा दाखल

Hagawane brothers fake address case : शशांक आणि सुशील हगवणे यांच्यावर खोटा पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद. भारतीय दंड संहिता आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Vaishnavi Hagawane News : शशांक हागवणे व सुशील हगवणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तर वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शशांक हगवणे याने १७ ऑक्टोबर २०२२ मध्ये पुणे पोलिस आयुक्तालयात स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळण्याबाबत अर्ज केला होता. हा अर्ज करताना शशांक ने त्याचा रहिवासी पत्ता पुण्यागील कर्वेनगर येथील असल्याचे दाखला दिला. शशांक याचा मूळ पत्ता मुळशी तालुक्यातील भूकुम या ठिकाणचा असताना सुद्धा आपण पुणे शहरातील कर्वेनगर मध्ये गेल्या १० वर्षांपासून राहत असल्याची माहिती दिली. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशांक याच्यावर भारतीय न्याय संहिता चे कलम १७७, १९१, १९२, १९३, ४१७, ४२० सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३० व शस्त्र नियम २०१६ चे कलम ११(८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक याचा भाऊ सुशील याच्यावर सुद्धा शस्त्र मिळवण्यासाठी कोथरूड येथे राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

Green Tea: रोगप्रतिकारकशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे ग्रीन टी

SCROLL FOR NEXT