Sharmila Thackeray-Aditya Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Sharmila Thackeray News : आदित्य असं काही करेल मला वाटत नाही; दिशा सालियान प्रकरणावर शर्मिला ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Sharmila Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर होणारे हे आरोप राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खोडून काढले आहेत.

प्रविण वाकचौरे

Mumbai Latest News :

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. टीममध्ये तीन अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंवर होणारे हे आरोप राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खोडून काढले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल. चौकश्या तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलो आहोत, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशारितीने अडचणीत सापडलेल्या आदित्य ठाकरे यांची बाजू काकी शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे. (Latest Marathi News)

आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा- नितेश राणे

आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

दिशाचा मृत्यू नेमका कसा झाला?

सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मालाडमधील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला होता.

दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला असल्याने यात कोणताही राजकीय अँगल नसल्याचा सीबीआयनं निष्कर्ष काढला होता. मात्र सत्ताधारी आमदारांकडून या प्रकरणाची चौकशी मागणी केली जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

Kuchipudi Dance History: 'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, भाऊबीज साजरी करण्यासाठी जयजयवंती यांच्या घरी पोहचले; पाहा VIDEO

Parineeti Chopra Birthday: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या अभिनेत्रीची नेटवर्थ

EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

SCROLL FOR NEXT