Ajit pawar and Yugendra Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar vs Yugendra Pawar : शरद पवार यांचा 'नवा गडी, नवा डाव'; बारामतीत अजित पवारांविरोधात उमेदवार कसा ठरला?

Sharad pawar News: शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. शरद पवार गटाने बारामती मतदारसंघात विश्वासू शिलेदार उतरवला आहे.

Vishal Gangurde

पुणे : शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार गटाने बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. शरद पवार गटाने बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बारामतीत उमेदवार जाहीर केल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाने बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. बारामतीचा उमेदवार कसा ठरला, यावर जयंत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

बारामतीचा उमेदवार कसा ठरला,यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'बारामतीत स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकाकडून उमेदवाराची मागणी होऊ लागली होती. त्यांना तरुण, सुशिक्षित असा उमेदवार हवा होता. त्यामुळे पक्षाकडून हाच योग्य उमेदवार आहे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे युगेंद्र पवार यांना उमेदवार जाहीर केली'.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहे. तसेच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे बारामती मतदारसंघात अत्यंत सक्रिय आहेत. युगेंद्र पवार यांच्याकडे बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तसेच ते अनेक पदावर काम करत आहेत. मतदारसंघातील विविध समाजिक कार्यक्रमात सक्रिय असतात. गेल्या काही महिन्यांपासून युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत.

युगेंद्र शरयू अॅग्रोचे सीईओ आहेत. बारामती विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार देखील आहेत. त्याचबरोबर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबादीर त्यांच्यावर आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांना साथ दिली आहे. ते तरुणांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT