Sharad Pawar News  SAAM TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar : शरद पवारांचा मोठा निर्णय! लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, कारण...

Sharad Pawar Breaking News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पवार लोकसभा निवडणूक लढणार नाहीत.

Nandkumar Joshi

रुपाली बडवे, मुंबई

Sharad Pawar Breaking News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पवार लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीत पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी, आतापासूनच राजकीय रण तापलं आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून लोकसभा मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर स्वतः शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Breaking Marathi News)

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय शरद पवार यांनी लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीत जाहीर केला. आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करणार असून, संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितले. पक्ष बळकट करण्यासाठी राज्यासह देशातही दौरा करण्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत शरद पवार यांनी हा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी लढायचं आहे आणि नवीन लोक आपल्या संपर्कात येत आहेत, असा दावा केला. मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचनाही पवार यांनी उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या.

'आता आम्ही मोकळा श्वास घेतोय...'

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी 'रिक्वेस्ट' कालच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली होती. आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भुजबळ जेव्हा होते, तेव्हा आमचा श्वास अडकला होता. पण, आता आम्ही मोकळा श्वास घेत आहोत, असं पदाधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

SCROLL FOR NEXT