जालन्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलं आहे. जालन्यातील अंतरवाली येथील आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्जनंतर तेथील आंदोलन चिघळल्याची माहिती आहे. तेथील आक्रमक आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. या घटनेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध केला आहे. 'महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)
शरद पवार यांनी ट्विट करत जालन्यातील घटनेवर भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले, 'महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. ही अतिशय संतापजनक बाब आहे. जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो'.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे. विजय वडेट्टीवर म्हणाले, 'आजचा लाठीहल्ला हा सरकारचा क्रूरपणा आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूक करण्याचे काम केले आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवय आरक्षण देता येणार नाही, खोटे बोलवून मते घेतली. आरक्षण मागताना लाठीचार्ज करून जखमी केले. हक्कासाठी रस्त्यावर उतरणे गुन्हा नाही,याचा निषेध करतो'.
'मराठा समाजाला फसवणाऱ्या मराठा समाज माफ करणार नाही. मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. कार्यकर्त्यांना मारहाण करून जखमी केले, त्यांच्यावर कारवाई केले पाहिजे. आरक्षण नावाने तुंबडी भरण्याचे काम सुरू आहे. आरक्षण नावाने तुंबडी भरण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.
जालन्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं आहे. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट झाली. या घटनेत ८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जालन्यामध्ये जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत, अशी प्राथमिक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.