Sunetra Pawar at the center of Baramati bypoll as NCP (Sharad Pawar faction) opts out of contest. Saam Tv
मुंबई/पुणे

सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीत निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य - शरद पवार

Baramati by-election 2026 updates : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय योग्य असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. बिनविरोध निवडणुकीची गरज नसल्याचे सांगत त्यांनी राहुरी आणि विलिनीकरणाच्या चर्चांवरही भाष्य केले.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar statement on Baramati bypoll : बारामती अथवा राहुरी, निवडणूक बिनविरोध करण्याचे काही कारण नसते. समोर कुणीतरी उभे राहील हे पाहूनच निवडणुकीची तयारी करावी लागते. बारामतीत उमेदवार देणे हा काँग्रेसचा अधिकार आहे. परिस्थिती पाहून बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार म्हणाले. ते राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. बारामतीमध्ये काँग्रेसची लढण्याची भूमिका योग्य असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीवर महत्त्वाचे भाष्य केले. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही महत्त्वाचे विधान केले. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेंनी माघार का घेतली, याबाबत माहिती नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तो निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विलीनीकरणाची चर्चा होती, असे म्हणत शरद पवार यांनी सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिले. "आमच्या पक्षात आता विलीनीकरणाची चर्चा नाही. अजित पवार यांचा आग्रह वेगळा होता," असेही शरद पवार म्हणाले. "माझा फोटो त्यांच्या बॅनरवर असेल तर ते चुकीचे आहे," अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्याबद्दल सर्वांना आदर होता. त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. "कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे," असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर शरद पवार यांनी बोलणे टाळले. आयोगाला लिहिलेल्या पत्रावर त्यांनी परखड मत मांडले. त्यांनी कोणत्या सहकाऱ्यावर विश्वास ठेवायचा, हा त्यांचा प्रश्न असल्याचे शरद पवार म्हणाले. त्याशिवाय पार्थ पवार यांच्यावरही शरद पवार यांनी वक्तव्य केले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही माहिती नाही, पण महत्त्वाच्या लोकांवर बोलण्यासाठी परिपक्वता लागते; त्यांच्याकडे किती राजकीय परिपक्वता आहे, हे माहिती नाही, असे शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये उमेदवार देणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही, असेही शरद पवार म्हणाले. नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. अशोक खरातला फोन करणाऱ्यांमध्ये अनेकांची नावे आहेत, ती लवकरच समोर येतील, असे पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट कस्टर्ड, वाचा सोपी रेसिपी

तनपुरेंना थेट केरळमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन, पुढच्या क्षणाला निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले

Throat cancer: 99 टक्के लोकं या लक्षणांकडे करतात दुर्लक्ष; घशाचा कॅन्सर झाल्यावर शरीर काय संकेत देतं वाचा

Navi Mumbai: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी महिला अन् पुरूषाला नको 'त्या' अवस्थेत पकडलं

SCROLL FOR NEXT