Sharad Mohol killer Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी २ आरोपींना अटक; आरोपींची संख्या १० वर

Sharad Mohol News : धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आरोपींना पुरवले असल्याची माहिती आहे. धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. (Crime News)

गुंड शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी भरदिवसा सुतारदरा येथील घरासमोर खून करण्यात आला होता. त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याच्या इतर साथीदारांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. पूर्ववैमन्यासातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.

हत्येचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पोळेकरचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. साहिल पोळेकरला मामाच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. मामावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी साहिलने हे पाऊल उचलल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

आरोपींची नावे

याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीये. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर, धनंजय वटकर, सतीश शेडगे दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT