Sharad Mohol  Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Mohol News : शरद मोहोळला कसं संपवायचं? आरोपीने महिनाभर केला होता सराव, 'मुळशी' कनेक्शन उघड

प्रविण वाकचौरे

नितीन पाटणकर

Pune News :

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपासात नवनवीन माहिती या प्रकरणात समोर येत आहे. शरद मोहोळला संपवण्यासाठी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यांनी हत्येच्या आधी काही दिवस फायरिंगची प्रॅक्टिस केली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद मोहोळच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात दिसत आहेत की मुन्ना पोळेकर आणि त्याच्या दोन साथिदारांना शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या आणि काही क्षणात त्याला संपवलं. मात्र यासाठी साहिल पोळेकरने काही दिवसं मुळशी येथील भादे गावात फायरिंगची काही दिवस प्रॅक्टिस केली होती. तब्बल महिनाभर त्याने ही प्रॅक्टिस केली होती. (Crime News)

हत्येचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पोळेकरचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. साहिल पोळेकरच्या मामाची यामध्ये मोठं नुकसान झालं होतं. मात्र शरद मोहोळच्या दहशतीमुळे त्यांना काहीही बोलता येत नव्हतं. म्हणूनच मामावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी साहिलने हे पाऊल उचललं.

आरोपींची नावे

याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीये. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

SCROLL FOR NEXT