shantinagar police station saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Crime News : त्याच्याबद्दल नुसता संशय आला अन् तो खरा ठरला; अंगझडतीत सापडलं घबाड...

Thane News : शांतीनगर पोलीसांनी संशयिताची अंगझडती घेतल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Bhiwandi News : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाचे उत्पादन करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात येत आहे. भिवंडी येथे देखील पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांची विक्री करणा-यांवर धाडी टाकण्यास प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

भिवंडी शहरात एका व्यक्तीस शांतीनगर पोलीसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 110 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशु दिपेंद्र सिंग (वय 26, राहणार न्यू कणेरी पद्मानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत पोलीसांना गुप्त माहिती मिळाली हाेती. या माहितीनुसार पाेलीसांनी सापळा रचत एमडी ड्रग्ज हा अंमली पदार्थ स्वतः जवळ बाळगून विक्री करण्याकरीता भादवड पाईपलाईन परिसरात आल्यानंतर त्यास पकडले.

शांतीनगर पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली. त्याच्या जवळ 6 लाख 71 रुपये किमतीचा 110 ग्रॅम वजनाचा एमडी पावडर व मोबाईल असा एकूण 7 लाख 21 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शांतीनगर पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Raigad Crime: रायगड हादरले! महिलेची आत्महत्या, कुंडलिका नदीत मारली उडी

SCROLL FOR NEXT