shahaji bapu patil on uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

Shahaji Bapu Patil on Uddhav Thackeray: 'आता सर्व मणके व्यवस्थित झाले'; उद्धव ठाकरेंवर टीका करताना शहाजी बापू पाटलांची जीभ घसरली

शहाजी बापू पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे.

सूरज सावंत

सूरज सावंत

shahaji bapu patil News: शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष अद्याप सुरूच आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टोला-प्रतिटोला सुरू आहे. याचदरम्यान, शहाजी बापू पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे. 'आता सर्व मणके व्यवस्थित झाले, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली आहे. (Latest Marathi News)

आमदार शहाजी बापू पाटील यांनी 'शासन आपल्यादारी' या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अनिल बाबर, महेश शिंदे उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शहाजी बापू पाटील म्हणाले, 'राजकारण खालच्या थराला गेलं आहे. रोज उठून काहींना काही आरोप ते मातोश्रीतील आणि ३-४ टाळकी करत असतात. एरवी कधीही न घराबाहेर पडलेले उद्धव ठाकरे, आम्ही गुवाहाटीला गेलो की आता तरणेताट झाले. आता सर्व मणके व्यवस्थित झाले'.

'दररोज उठून आठ महिने आमच्यावर भूंकत आहे. शिंदेंची नियत साफ आहे. आज कर्नाटकचा निकाल लागला. मात्र आनंद मातोश्रीला जास्त झाला. आम्हाला शिव्या देताय. आम्ही तडफदार आहोत. आम्ही दबंग आणि बाजीगर आहोत. आम्हाला आमदारकीच्या काय भीती का घालता? आम्ही पहिल्या रांगेतले आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असा इशारा शहाजी बापू पाटील यांनी दिला.

'माझं त्या 'झाडी डोंगरने डोकं उठवलयं. दररोज २०० हून अधिक फोन त्यासाठी येतात, असेही ते म्हणाले. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली . 'अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग घेऊन फिरत आहेत. मात्र, नवरी काय मिळत नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.

'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अडीच वर्षात फक्त २ कोटी खर्च केले.मात्र शिंदेंच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपये खर्च करून अनेकांचे जीवन वाचवले. शिवसेनेचा भगवा हा पताका खांद्यावर घ्या आणि आठवण ठेवा, आपल्या शंभूराजेंना निवडून द्या. आपल्या झाडीवर सध्या संजय राऊत पडलेय,म्हणून आपला डॉयलॉग परत घेतो, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT