Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

संजय पांडेंच्या सांगण्यावरुन खार पोलिसांनी 'ते' पेपर फाडले; सोमय्यांचा गंभीर आरोप

'मुंबई पोलिस कमिशरच्या मार्गदर्शनाद्वारेच शिवसेनेच्या ७० ते ८० गुंडानी माझ्यावर हल्ला केला.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaia) यांनी खार पोलीस स्थानका बाहेर पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिस आयुक्तांसह मुख्यमंत्र्यावर आरोप केले. उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांच्या सुचनेमुळेच खार पोलिसांनी माझी तक्रार घेण्यास मनाई केली असल्याचं सोमय्या म्हणाले. तसंच माझ्या नावाने जी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर माझी सही नाही हे देखील खार पोलिसांनी मान्य केलं आहे. मग माझ्या सहीशिवाय मुंबई पोलिसांनी ती तक्रार अधिकृत करुन कारवाई सुरु कशी केली असा प्रश्न सोमय्यां यांनी उपस्थित केला.

तसंच मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) फसवणुकीचं उदाहरण जनतेसमोर आलं असून पोलिसांनी माझी तक्रार बेवसाईट वर टाकली आहे. मात्र, त्यावर माझी सही नाही असही त्यांनी सांगितलं. ज्या पोलिसांनी माझी खोटी एफआयआर नोंदवली त्या पोलिसांविरोधात चौकशी करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. शिवाय मुंबई पोलिस कमिशरच्या मार्गदर्शाना अंतर्गत ज्या ७० ते ८० शिवसेनेच्या गुंडानी माझ्यावर हल्ला केला होता. ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबईचे पोलिस कमिशनर संजय पांडे यांच्या आदेशाने काल सकाळी बांद्रा पोलिसांनी खोटी तक्रार नोदंवून ती खार पोलिसांना पाठवली आणि ती माध्यमांकडे देण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

हे देखील पाहा -

मी केसची कॉपी मागितली तर त्याच्यावर माझी सही नाही. १५४ च्या अंतर्गत त्या तक्रारीवर माझी सही पाहिजे, हे पोलिसांना माहित नाही का असा सवाल करत संजय पांडे यांच्या सांगण्यावरुन खार पोलिसांनी पेपर फाडून टाकले आहेत. मात्र, मुंबई पोलिसांची ही माफियागिकरी आम्ही चालू देणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण उद्या १२.३० वाजता राज्यपालांना (Governor) भेटणार असून बनावट FIR चा तपास करुन तो दाखल करण्यावर कारवाची मागणी करणार असल्याचंही सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

Hair Wash Risks: सलोनमध्ये केस धुतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

Shocking: नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं; बायकोने घडवली कायमची अद्दल, गुप्तांगावर फेकलं उकळतं पाणी अन् अ‍ॅसिड

Thamma Collection : 'थामा'ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी 'सैयारा'ला पछाडलं, रश्मिका-आयुष्मानची जोडी सुपरहिट

SCROLL FOR NEXT