Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री; सिंहगड पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime News: या दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News: पुण्यातील सिंहगड परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थाची (मेफेड्रॉन आणि चरस) विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांच्या ताब्यातून दोन लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. (Pune Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थ (Narcotics) विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना यावेळी त्यांना हे आरोपी अंमली पदार्थ विकत असताना दिसले.

तेव्हा पोलिसांनी (Pune Police) त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडून दोन लाख रुपयाचं मेफेड्रॉन आणि चरस सापडले. या दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत जनार्दन दांडेकर (वय 20) आणि आकाश महिंद्र ठाकर (वय 22) अशी अटक करण्यात या दोघांची नावे आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील अखिल ओमकार मित्र गणेश मंडळ गणेश मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT