पोलीस-दरोडेखोरांमध्ये झटापट; अंगावर घातली भरधाव कार अनेक पोलीस जखमी
पोलीस-दरोडेखोरांमध्ये झटापट; अंगावर घातली भरधाव कार अनेक पोलीस जखमी 
मुंबई/पुणे

पोलीस-दरोडेखोरांमध्ये झटापट; अंगावर घातली भरधाव कार अनेक पोलीस जखमी

गोपाल मोटघरे

पुणे: पिंपरी चिंचवड शहरा जवळील उर्से टोल नाक्याजवळ पिंपरी- चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police Station) आणि दरोडेखोरात आज दुपारी मोठी झटापट झाली आहे. या झटापटीत मध्य प्रदेश मधील अट्टल दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर भरधाव कार घातली आहे. या झटापटीत काही पोलिस देखील गंभीर कर्मचारी झाले आहेत. जखमी झालेल्या पोलिसांवर आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेश मधिल काही अट्टल दरोडेखोर  पिंपरी-चिंचवड मध्ये आज दुपारी  दरोडा घालण्यासाठी येत आहेत. अशी गोपनीय माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विभागाला मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उर्से टोलनाक्याजवळ दरोडेखोरांना अटक करण्यासाठी बंदोबस्त लावला होता. मात्र, पोलिसांनी दरोडेखोरांची गाडी अडवताच दरोडेखोरांनी भरधाव गाडी पोलिसांच्या अंगावर घातली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गाडीला अडविल्यानंतर दरोडेखोर जवळच असलेल्या डोंगरांमध्ये पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी आठ दरोडेखोरांना ताब्यात घेतल आहे. तर अजूनही 2 दरोडेखोर फरार आहेत. फसार झालेल्या दरोडेखोरांचा शोध पिंपरी-चिंचवडचे गुंडा विरोधी पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT