Mumbai Dahisar Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मित्रांसोबत रात्री पार्टीला गेली, घरी परतलीच नाही; तरुणीसोबत घडली भयानक घटना

Dahisar News : प्रिया कनोजिया असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

Satish Daud

Mumbai Accident News : मित्रांसोबत पार्टीला जात आहे, असं म्हणत तरुणी रात्री घराबाहेर पडली. रात्रभरात ती घरी परतली नाही म्हणून आई वडिलांना काळजी होऊ लागली. सकाळी आणि तिच्या मैत्रिणीला फोन केला अन् मुलीविषयी विचारले. तेव्हा मैत्रिणीने सांगिलेल्या घटनेनं आईच्या पायाखालची जमीनच सरकली. (Latest Marathi News)

मुंबईतील (Mumbai News) एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. प्रिया कनोजिया असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

गेल्या आठवड्यात ८ एप्रिल म्हणजे शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडली होती. मित्रांसोबत पार्टीला जात आहे, असं तिने आईला सांगितलं. रात्री उशीर होऊन सुद्धा प्रिया घरी न आल्याने तिच्या आईने प्रियाच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर फोन केला.

तेव्हा प्रियाचा पार्टीवरून परतत असताना वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील दहिसर परिसरात अपघात (Accident) झाला, असं तिच्या मैत्रिणीने सांगितले. ही घटना ऐकून आईल धक्काच बसला. दरम्यान, प्रियाच्या आई-वडिलांनी दहिसर परिसरात धाव घेतली.

रस्त्यामध्ये त्यांनी पुन्हा प्रियासोबत असलेल्या मैत्रिणीने फोन केला. तिने प्रियाला कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. दरम्यान, सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रियाचे आई-वडील रुग्णालयात पोहचले. तेव्हा प्रियाचा अपघाती मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेनं कनोजिया परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पार्टीवरून परतत असताना परत येत असताना प्रिया स्कुटर चालवत होती. तिच्या पाठीमागे तिचा ऑफिसमधील एक मैत्रीण बसली होता. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर दहिसर परिसरात असताना त्यांच्या स्कुटीचा अपघात झाला.

यामध्ये प्रियाचा जागीच मृत्यू झाला तर तिचा सहकारी जखमी झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत प्रियाच्या मैत्रिणीने अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, प्रियाच्या स्कुटीला रस्त्यावरुन जाणाऱ्या एखाद्या वाहनाची धडक बसली असावी, असा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT