pune news, school reopen, rajgurunagar, school , students, parents saam tv
मुंबई/पुणे

Pune School Reopen: पुण्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर कटू प्रसंग, फी न भरल्याने व्यवस्थापनाने दाखविला बाहेरचा रस्ता

Rajgurunagar School: शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेचा पालकांनी निषेध नाेंदविला.

रोहिदास गाडगे

Pune News : नाशिकपाठाेपाठ पुण्यातील राजगुरुनगर येथे शाळा व्यवस्थापनाच्या विराेधात पालक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे त्यांना शाळेच्या आवारात कडक उन्हात फरशीवर बसविल्याने पालकांचा पारा चढला आहे. तर विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या (school reopens in maharashtra today)  दिवशी कटू प्रसंग अनुभवयास मिळाल्याने ते हिरमुसले आहेत. (Maharashtra News)

आज राज्यभरातील शाळांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जात आहे तर दुसरीकडे पुण्याच्या राजगुरुनगर येथील शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना थेट शाळेचा बाहेरचा रस्ता दाखविला. यामुळे बिचारी मुलं कडाक्याच्या उन्हात शाळेच्या व्हरांड्यातील फरशीवर बसली आहेत. (school from rajgurunagar prohibited students to sit in classroom)

खरंतर शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी आनंदाचा दिवस असतो मात्र फी अभावी मुलांच्या आनंदावर विरजन पडलं आहे. साम टीव्हीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता फी भरली नाही म्हणून आम्हांला बाहेर बसवलं आहे असे त्यांनी सांगितले. शाळेच्या या कृत्याचा राजगुरुनगर शहरातुन संताप व्यक्त होत आहे.

मनसेचा आंदाेलनाचा इशारा

शाळेच्या या कृत्यामुळे मनसेचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे ,शहराध्यक्ष सोपान डुंबरे, नितीन ताठे यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उद्या शेठ केशरचंद पारख इंग्लिश मिडियम स्कूलचा निषेध करण्यात येणार असल्याचे पदाधिका-यांनी सांगितले.

दरम्यान आज नाशिक येथे देखील सुविधांअभावी शाळेच्या बाहेर पालकांनी विद्यार्थ्यांसह ठिय्या मांडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swine Flu : स्वाइन फ्लूचा धोका वाढलाय; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या 'हे' ३ हेल्दी ड्रिंक्स

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! १८,००० असणारा बेसिक पगार थेट ₹६८,९४० होणार? मोठी अपडेट समोर

Sleep Jerks: झोपेत असताना अचानक झटका का लागतो?

Maharashtra News Live Update: माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला एसटी बसमधून प्रवास

SCROLL FOR NEXT