पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहारापासुन शाळकरी मुलं वंचित रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहारापासून शाळकरी मुले वंचित

शालेय पोषण आहार पुरवठा झाल्यानंतरच शाळेत आहार देण्यात यावा असे मेसेज अधिक्षकांकडुन देण्यात आलेत

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: पुण्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक शाळा सुरु होऊन एक महिना उलटला मात्र अद्यापही फेब्रूवारी महिन्याचा पोषण आहाराच्या खाद्य वस्तु पुरवठा न झाल्याने उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेत पोषण आहार शिजवला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

कोरोना (Corona) पार्श्वाभुमीवर शाळा बंद होत्या या काळातील सात महिन्यांचा पोषण आहाराचा तांदुळ अजुन पुरवठा सुरु आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा तांदुळ उपलब्ध नसल्याने शाळकरी मुलांना शाळेत पोषण आहार दिला जात नाहीय. ता. 15 मार्चपासून शाळास्तरावर शालेय पोषण आहार शिजवून देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र पुरवठादाराकडून तांदुळ आणि इतर वस्तुचा अद्याप पुरवठा झाल्यानंतरच शालेय पोषण आहार शिजवून देण्यात याव्यात अशा सुचना शाळांना मेसेजद्वारे देण्यात आल्यात.

ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने, त्या कुटुंबातील मुले शालेय पोषण आहाराच्या निमित्ताने शाळेत शिक्षण घेतात. त्यातून चिमुकल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारकडुन शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली मात्र शालेष पोषण आहाराच्या वस्तुंचा वेळेत पुरवठा झाला नसल्याने एक महिना उलटुनही मुलांना पोषण आहापापासुन वंचित रहाण्याची वेळ आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT