पुण्यातील सारसबाग परिसरातील देवीला सोन्याची साडी अर्पण,पाहा हा लखलखता व्हिडिओ...  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील सारसबाग परिसरातील देवीला सोन्याची साडी अर्पण,पाहा हा लखलखता व्हिडिओ...

पुण्यामधील सारसबाग या ठिकाणी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला सोन्याची साडी अर्पण करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यामधील सारसबाग Saras baug या ठिकाणी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील Shri Mahalaxmi Temple देवीला सोन्याची साडी Gold Saree अर्पण करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून ही साडी अर्पण करण्यात आली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. वर्षभर फक्त २ वेळा म्हणजेच दसरा Dussehra आणि लक्ष्मीपूजन या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येत आहे.

यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप बघण्याकरिता देवीभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. दक्षिण भारतात कारागिरांनी १० वर्षांअगोदर ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याच काम चालू असते. आकर्षक नक्षीकाम करुन, ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ११ वे वर्ष आहे.

पहा व्हिडिओ-

दसऱ्याच्या दिवशी हळदी- कुंकू आणि ओटीच्या कार्यक्रमाद्वारे नवरात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला आहे, अशी माहिती मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी दिली आहे. दसऱ्याच्यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत भाविक कोविडचे सर्व नियम पाळून दर्शनाकरिता येत आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन ऑनलाईन पूजा संकल्प तसेच फेसबुक पेज आणि युट्यूब तसेच स्थानिक केबलवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतले आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येत आहे. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिक जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये झाले आहे. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, लस देणा-या सेवकांचा गौरव, कोविड काळात पालकत्व हरपलेल्या आणि देवदासिंच्या कन्यांचे पूजन, सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान, पोलीस खात्यामधील महिलांचा गौरव असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT