Mumbai News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: सांताक्रुझमधील सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; सापळा रचत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोनसाखळी चोरून फरार झालेल्या दोन चोरांच्या सांताक्रुज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai News: मुंबईत मागील काही दिवसांपासून रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच सोनसाखळी चोरून फरार झालेल्या दोन चोरांच्या सांताक्रुज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रेहान अली अख्तर शेख (२४ वर्ष) आणि मोहसीन अन्वर आली तनवर (३४ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्हीही आरोपीं विरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. (Latest Mumbai Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची काकू हे रस्त्यावरून चालत असताना त्यांच्या समोरून मोटरसायकलवर दोन तरुण आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या काकूला धक्का दिल्यामुळे त्या दोघी घाबरून गेल्या आणि बाईक वरील तरुणांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची व हिर्याचे पेंडल असलेली सोनसाखळी हिसकावून ते पळून गेले. त्यानंतर फिर्यादीनी या संदर्भातील तक्रार सांताक्रुज पोलीस ठाण्यामध्ये दिली यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

गुन्हा दाखल होताच सपोनी तुषार सावंत, पोउपनी धनंजय आव्हाड आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. तब्बल ९० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन अनोळखी इसमानचे फुटेज प्राप्त झाले आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन दोन्ही आरोपी हे दौलत नगर सांताक्रुझ (प) मुंबई परिसरात राहत असल्याचे समजले.

यानंतर पेलिसांनी सापळा रचून एका आरोपीला सांताक्रुज (santacruz) परिसरातून आणि दुसऱ्या आरोपीला ठाणे परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT