Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया ''लढाई कायद्याची अन्...''

मंत्री अनिल देखमुखांनी (Anil Deshmukh) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका आहे. काही महिन्यांत महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत पोहोचला आहे. याआधी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती.

मंत्री अनिल देखमुखांनी (Anil Deshmukh) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रकारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनाही आज ईडीने अटक केली आहे, त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार का याकडे लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्या पक्षाचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेला निघणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अटकेनंतर आता संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत म्हणाले की पुर्ण देश जाणतो की महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये काय सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने सुडबुद्धीने जर कारवाई केली असेल त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, शरद पवार आणि कॅबिनेट मंत्री योग्य तो निर्णय घेतील. विरोधी पक्ष राजीनाम्याची मागणी करतच असतो करुद्या पण राजीनाम्याचा निर्णय राज्याचे प्रमुख घेतील. आता ही कायद्याची आणि राजनैतिक लढाई असल्याचे संजय राऊत म्हणले. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात असल्याचंही राऊत म्हणाले.

दरम्यान आज, दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. (ED Arrested Minister Nawab Malik After 8 hours of Inquiry).

गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांनी स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहेत. मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल, असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय, मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

SCROLL FOR NEXT