sanjay Raut ed news Saam TV
मुंबई/पुणे

ED Raid: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ईडीची आणखी दोन ठिकाणी छापेमारी

Sanjay Raut Latest News : नेमक्या कोणत्या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणींत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांशी संबंधित दोन ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. तसेच ईडीकडून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना समन्स पाठवण्यात आलं आहे, तर दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. नेमक्या कोणत्या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, ईडीची छापेमारी सुरू असल्याने ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या अडचणींत यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut Latest News)

हे देखील पाहा -

शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. ईडीने अगोदर ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, पण कोर्टाने तीन दिवसांची ईडी कोठडी दिली आहे.

ईडीने राऊतांची सलग ९ तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर राऊत यांची रात्री १ च्या दरम्यान त्यांना अटक केली. सकाळी मेडिकल तपासणी करुन राऊत यांना कोर्टात आणले गेले होते. संजय राऊत हार्ट पेशंट आहेत ते तपासाला मदत करत आहेत, असा युक्तीवाद राऊत यांच्या वकीलांनी केला. ४ तारखेला पुन्हा संजय राऊत यांना ईडीच्या कोर्टासमोर उभे केले जाणार आहे.

ईडी (ED) कोठडीत राऊत यांना घरचे जेवण देण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून पैसे कसे मिळाले, त्या पैशाचा त्यांनी कसा वापर केला. तसेच प्रविण राऊत यांचा महिन्याचा खर्च, विमानाची तिकिटे संजय राऊत काढून द्यायचे असा आरोप ईडीने केला.

संजय राऊत यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले. राजकारण करुन संजय राऊत यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तीवाद राऊत यांच्या वकीलांनी केला. तसेच यावेळी कोर्टाने यावर ३ दिवसांची कोठडी दिली, या चौकशीसाठी आठ दिवसांची कोठडीची आवश्यकता नाही, असं कोर्टाने म्हटले. (ED Latest News)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT