Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास शपथविधीला उपस्थित राहणार, संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics: सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर त्यांच्या शपथविधीला स्वतः उपस्थित राहणार असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात जोर आला आहे. एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या बदल्यात शरद पवार मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण सुप्रिया सुळे यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर मिश्किल प्रतिक्रिया दिलीये.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

संजय राऊतांची चर्चांवर प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांची कालची प्रतिक्रिया आपण पाहिली असून, 'मी 12 वर्षांपासून मंत्रीपदाची शपथ घेतच आहे', असं त्या म्हणाल्या होत्या, असं राऊत यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल, असंही ते म्हणाले. केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकतो. भाजपकडे इतकी दिलदारी आहे, असा नवा रेकॉर्ड तयार होणार आहे, असा टोला त्यांनी लगावला. 'त्यांना मुख्यमंत्री होऊ द्या ना. त्यांनी शपथ घेतल्यावर आम्ही बोलू', असंही राऊत म्हणाले.

निर्णय उद्धव ठाकरेच घेतील

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यास ठाकरे गट त्यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांनाही पाठिंबा देणार का, असा सवाल करण्यात आला.

यावर राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि तेच याबाबत निर्णय घेतील, असं सांगितलं. पण सुप्रिया सुळे खरोखर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे, असं आपलं वैयक्तिक मत असल्याचं ते म्हणाले.

10 आमदारांची ताकद असलेला पक्ष आणि त्यातही तीन गट असताना मुख्यमंत्रीपद मिळत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे, असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला.

'त्या आमच्या घरातील सदस्य'

सुप्रिया सुळे या आमच्या घरातील सदस्य आहेत. त्या मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला आनंदच आहे. मी पाहिली आहे. मी 12 वर्षापासून मंत्रीपदाची शपथ घेतच आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधीला मी स्वतः उपस्थित राहून त्यांचं स्वागत करेन, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

रोहित पवार महत्त्वाचे नेते

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार एकाकी पडल्याची चर्चा सुरू आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार यांच्या पक्षातील धोरणात्मक निर्णयांवर आपण बोलू शकत नाही, असं ते म्हणाले. राऊत म्हणाले, रोहित पवार अनेक प्रश्नांवर आंदोलन करतात आणि संघर्ष करत असतात. जनतेचे प्रश्न म्हणून पाहिलं तर ते महत्त्वाचे आहेत. रोहित पवार जनतेचं काम करत असून विरोधी पक्षाचं काम करत आहेत, असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा न्यायालयाला पुन्हा बॉम्ब धमकीचा मेल; सलग तिसऱ्यांदा धमकी

Health Tips : जेवताना पाणी पिता? मग ही चूक करताय की योग्य सवय लावताय? जाणून घ्या सत्य

Politics: मोठी बातमी! NDA ची ताकद वाढली, ४ मोठे पक्ष सहभागी; संख्याबळ ४२ खासदारांनी वाढले

Sharad Pawar Hospitalised : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; बैठक सोडून सुप्रिया सुळे तातडीने रुग्णालयाकडे रवाना

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT