Political News Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : 'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते, कलाकारांवर कारवाई करणार का? दत्ता दळवी यांच्या अटकेवर संजय राऊत यांचा संतप्त सवाल

Maharashtra Political News : दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक शब्द वापरला. मात्र हाच शब्द धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांच्या तोंडी आहे. तो सेन्सॉर बोर्डने काढला नाही.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिला आहे. यावेळी त्यांनी धर्मवीर सिनेमातील आनंद दिघे यांच्या संवादाचा दाखला देत दत्ता दळवी यांच्यावरील कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहे.

...तर धर्मवीरचे निर्माते, कलाकारांवर कारवाई करणार का?

दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक शब्द वापरला. मात्र हाच शब्द धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांच्या तोंडी आहे. तो सेन्सॉर बोर्डने काढला नाही. त्या चित्रपटात आमच्या आनंद दिघे यांच्या तोंडी असलेला शब्द सेन्सॉर बोर्डने कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटाचे कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र तोच शब्द दत्ता दळवी यांनी वापरला म्हणून त्यांना अटक कशी केली जाते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी भांडूपमधील सभेतून माझ्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती, त्यांच्यावर कारवाई केली का? मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते, त्यांच्यावर कारवाई केली का? असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे.

लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई

राज्यात अवकाळी पाऊस आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रचारात व्यक्त आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्यकर्ते बाहेर असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यावरुन लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही सर्व दत्ता दळवी यांच्या पाठिशी आहोत. आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचं देखील आम्ही समर्थन करतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT