Sanjay Raut
Sanjay Raut  saam Tv
मुंबई/पुणे

राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान - संजय राऊत

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. पण राज्यपाल याच क्षणाची वाट पाहात होते. 16 आमदार निलंबनाचा विषय कोर्टात आहे 11 तारखेपर्यंत थांबा. यादरम्यान असं काही घडलं तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. पण भाजप आणि राज्यपाल भवन ते पायदळी तुडवत आहे. आमचे लोक सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागतील आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान आहे.आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे आहे शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केले.

...तर देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो

पुढे बोलतात संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, भाजप नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतायत , पण ते अयशस्वी होतील. त्यांना वाटतंय त्यांचं स्वप्नपूर्ती जवळ आली आहे तर त्यांना शुभेच्छा देतो अडीच वर्षांपासून ते अथक प्रयत्न करत आहे असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

माझ्या बोलण्याचा जर इतका त्रास होत असेल तर मी थांबतो

बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलू नये अशी मागणी केली आहे. बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलू नये अशी मागणी केली आहे. त्यांच्या बोलण्यामुळे सरकार संकटात आल्याचा दावा त्यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्या बोलण्याचा जर इतका त्रास होत असेल तर मी थांबतो मी माध्यमांशी बोलणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunaratna Sadavarte : गुणतत्न सदावर्तेंना सहकार खात्याचा मोठा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द

Sanju Samson Wicket: संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयानंतर पेटला वाद - Video

AC Coaches News : ज्ञानात भर पाडणारी माहिती! AC चा शोध लागण्यापूर्वी ट्रेनधील एसी कोच थंड कसे ठेवले जायचे?

Social Media मधील मैत्रीने केला घात, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दाेघांना अटक

Dog Attack Video: इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; अंगाचे लचके तोडले, भयानक घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT