Sanjay Raut News 
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: PM मोदी, एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा, २०२४ पूर्वी काय घडणार यावर केलं भाष्य

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी २०२४ पूर्वी काय घडणार यावर मोठं भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Sanjay Raut News:

ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी २०२४ पूर्वी काय घडणार यावर मोठं भाष्य केलं आहे. '2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. मी सांगतो ते घडते, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईच्या जुहू येथे बोलत होते. (Latest Marathi News)

शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी आमदार अनिल परब, उपनेत्यापदी राजुल पटेल आणि सचिव म्हणून वरून सरदेसाई यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानंतर शिवसेना विभाग क्रमांक चार- पाच आणि चांदिवली विधानसभा क्षेत्राच्या वतीने या पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईच्या जुहू येथील जेवीपीडी मैदानावर करण्यात आला.

या मैदानावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय राऊत म्हणाले, 'मी भाषण करायला अजिबात आलो नाही. आपण म्हणाला चार गुजराती आहेत, आपलं गुजराती माणसाशी भांडण नाही. तसेच गुजरातशीही भांडण नाही. जे जे महाराष्ट्राच्या वाट्याला आडवे आले, ते याच मातीत गाडले गेले'.

'आम्ही शिवसेना सोडून गेलेल्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्याचे काही अंश दिसतात, पण औरंगजेब गेला तसं तुम्हीही जाणार. 40 आमदार घरात बसणार, कायदेशीर लढा त्यांच्या विरोधात आहे, असे राऊत म्हणाले.

'महाराष्ट्र तोडण्याचे आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे काम केले जात आहे. आज बाळासाहेब असते तर झाले नसते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता 4-400 गुजराती येऊ द्या, एक शिवसैनिक भारी पडेल. शिवसेना महाराष्ट्राच्या मुंबईचे रक्षक आहे, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : मान्सूनचा प्रवास रखडला, पण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT