Sanjay Raut Shivsena Latest News, sanjay raut net worth ANI
मुंबई/पुणे

Sanjay Raut : ईडीच्या ताब्यात असणाऱ्या संजय राऊतांकडे संपत्ती किती? जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने रविवारी रात्री राऊतांना ताब्यात घेतलं. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांच्याजवळ नेमकी संपत्ती आहे तरी किती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या नावावर अनेक बॅंकांमध्ये FD आहेत. (sanjay raut net worth in rupees)

राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना संजय राऊत यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यानुसार, संजय राऊत यांची एकूण मालमत्ता 21.14 कोटी रुपये इतकी आहे. 2022 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये आपल्याकडे 1 लाख 55 हजार 772 रुपये रोकड असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं.

बँक खात्यात 1 कोटी 93 लाख 55 हजार 809 रुपये असल्याचं राऊतांनी सांगितलं होतं.याशिवाय राऊत यांनी पत्नी वर्षा यांच्याकडे असलेल्या सोन्याची माहिती दिली होती. आपल्या पत्नीकडे 729.30 ग्रॅम सोनं आहे असं राऊतांनी म्हटलं होतं.

आजचा भाव बघता या सोन्याची किंमत 39 लाख 59 हजार 500 रुपयांच्या घरात जाते. याशिवाय राऊतांच्या पत्नीकडे 1820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. त्यांची किंमत 30 हजार रुपयांच्या आसपास आहे.

किती प्लॉट आणि फ्लॅट?

दरम्यान, संजय राऊत यांच्याकडे अलिबाग, पालघर, दादर अशा भागांत फ्लॅट आणि प्लॉट असल्याची माहिती समोर आली आहे. हे फ्लॅट आणि प्लॉट राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याची माहिती आहे. सध्या राऊत यांच्या संपत्तीची चर्चा होत असताना ईडीने त्यांच्या घरातून जवळपास 11 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT