balasaheb thackeray 
मुंबई/पुणे

आज बाळासाहेब ठाकरे असते तर? सेना खासदार म्हणाले...!

बाळासाहेबांपुढे कोणाची हिंमत होती, ते असताना सौ सुनार की एक लोहार की असे हाेते.

जयश्री मोरे

मुंबई : बाळासाहेबांचे मन माेठ हाेतं. त्यांच्या सोबत राहणे ही रोज दिवाळी असायची. बाळासाहेब यांच्या सारखे माेठे मन मी तर काेणाचे पाहिले नाही. त्यांना देशाची, महाराष्ट्रची काळजी होती. शिवसैनिकांची काळजी हाेती. काेणाच्या घरी दिवाळी साजरी हाेते आणि काेणाच्या नाही याची ते माहिती ठेवतं. त्यांचा नेहमी मदतीचा हात पुढं असायचा असे सांगताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राऊत भावुक झाले. राऊत यांच्याशी आज (शुक्रवार) माध्यमांनी संवाद साधताना दिवाळीच्या कालावधीतील बाळासाहेब ठाकरेंची आठवणी विषयी विचारलेल्या प्रश्नावर ते बाेलत हाेते. Sanjay Raut Balasaheb Thackeray Diwali Festival Diwali 2021 Saam news

राऊत म्हणाले आम्ही दिवाळीला बाळासाहेबांना भेटायचो. त्यांच्यासमवेत काम करताना आमचे फटाके फुटायचे. जितके ते शिस्तप्रीय होते तितकेच ते प्रेमळ हाेते. दिवाळीच्या कालावधीत त्यांचे निधन झाले. त्यामुळे दिवाळीत मला त्यांची नेहमी आठवण येते असे राऊत यांनी सांगत असतानाच त्यांचे डाेळे भरुन आले.

बाळासाहेब असते तर ही राजकीय परिस्थिती कशी असती या प्रश्नावर राऊत यांनी ही परिस्थिती उद्भवलीच नसती असे सांगत हे लाेक आज वचावचा बोलताहेत त्यांच्या जीभा टाळूला चिकटून असती अशी टिप्पणी केली. बाळासाहेबांपुढे कोणाची हिंमत होती, ते असताना सौ सुनार की एक लोहार की असे हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT