Nawab Malik Brother Captain Malik Addressing Media In Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

भगवान के घर देर है पर अंधेर नहीं! मलिक कुटुंबियांना संजय राऊतांनी दिला धीर

जयश्री मोरे

मुंबई : तुमच्या सोबत आम्ही आहोत, घाबरू नका असा विश्वास खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज (शुक्रवार) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांना दिला. ईडीच्या कारवाईमुळे मलिक सात मार्चपर्यंत काेठडीत असणार आहेत. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खासदार शिवसेना नेते संजय राऊत हे नवाब मलिक त्यांच्या घरी आले हाेते. या भेटीनंतर नवाब मलिक (nawab malik) यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्यासह कुटुंबियांची भेट घेतली. खासदार राऊत यांच्यासमवेत त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (mla sunil raut) उपस्थित हाेते.

या भेटीनंतर नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक (captain malik) म्हणाले राऊत यांनी आम्हांला धीर दिला आहे. त्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, घाबरू नका असे सांगितलं. जीवनात असे होत असते, अजिबात घाबरू नका, भगवान के घर देर है पर अंधेर नहीं असेही राऊत यांनी म्हटल्याचे मलिक यांनी नमूद केले.

दरम्यान आज भाजप प्रणित वाहतूक सेनेने कामगारांच्या मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. एक वाजता नवाब मलिक यांच्या घराजवळच असलेल्या कार्यालयावर हा मशाल मोर्चा येणार आहे. या माेर्चात भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) देखील सहभागी हाेणार आहेत. असतील. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची मलिक यांच्या कुटुंबाची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT