Sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

संजय राऊतांपाठोपाठ त्यांच्या मित्रावरही गुन्हा दाखल, किरीट सोमय्यांनी पोलिसांत केली तक्रार

ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता एक नवी तक्रार मुंबई पोलिसांत दाखल केली आहे. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून त्यांचे मित्र सुजित पाटकर यांना कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याच्या आरोप सोमय्या यांनी (kirit somiya) केला आहे. या प्रकरणी पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबई महापालिकेतील जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सुजीत पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेला १०० कोटी कोव्हीड सेंटर घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी गोस्ट कंपनी आहे, या विरोधात तक्रार केली आहे. ही कंपनी रजिस्टर नसल्याचे यात म्हटले आहे. मुंबई महालिकेला एक कागदपत्र तर पुण्यात एक कागदपत्र असल्याचे म्हटले आहे. खोटे कागदपत्र दाखवून, चीटींग फ्रॉड करून खोट्या पद्धतीने कोविड कॉन्ट्रॅक्ट मिळवले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले होते. त्यांच्या अक्षमतेमुळे अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप यात केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ४२०,४०६, ४६५, ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आता संजय राऊत व त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागेल, सुजित पाटकर च्या खात्यात कोट्यवधी रुपये आले आणि ते पुढे गेले आहेत. याबाबत मी काददपत्रे ईडीला देत आहे, या घोटाळ्यात उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहभागी आहेत, असंही भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT