Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : कसबा-चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रित लढणार; संजय राऊतांच मोठं विधान

"आमचा शत्रू एकच, आम्ही एकत्रीत त्यांचा पराभव करू"

जयश्री मोरे

Sanjay Raut Latest News : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही आग्रही आहोच. या आधी आम्ही आमचा उमेदवारल दिला आहे. यापूर्वी आम्ही अनेक वेळा त्यागाची भुमिका घेतली. पण यावेळ आम्ही कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रित लढणार आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत दिली आहे.

आमचा शत्रू एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्रीत त्यांचा पराभव करू शकतो, हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आमच्यात मतभेद नाही.आमच्यात विसंवाद नाही. अंधेरीची (Andheri) निवडणूक लढली जिंकली आहे. तसेच यापुढे महाविकास आघाडी एक होऊन लढेल असे संजय राऊत म्हणाले.

शक्ती प्रदर्शनानं आणि पैशाची ताकद दाखवून देवी पावते का? ती कोकणातली भराडी देवी आहे. आयुष्यभर त्या देवीनं शिवसेनेला (Shivsena) आशीर्वाद दिलेत. शिवसेनेचा जन्म कोकणातून झाला आहे. भराडी देवीचा जर पाठिंबा असता तर कालच्या निवडणुकीत दिसला नसता, देवी ही देवी आहे, असं त्यांनी नमूद केलं.

उध्दव ठाकरेंनी विश्वासतल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला, त्यामुळं असं चित्र उभारलं आहे. 32 वर्षाच्या तरुणाचं (आदित्य ठाकरे) मुख्यमंत्र्यांनी आवाहन स्वीकारावं, असं आव्हानही राऊतांनी शिंदेंना केलं आहे. ते म्हणतात आम्ही क्रांती केली तर त्यांनी हे आव्हान स्वीकारले पाहीजे असे देखील राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

SCROLL FOR NEXT