Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

भोंग्यांवर काय बोलता,महागाईवर बोला; राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात भोंग्यांचा मुद्दाच नव्हता. काही लोकांनी दंगली करण्याचा प्रयत्न केला.

जयश्री मोरे

मुंबई - महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. तसेच मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेवरही राऊतांनी निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भोंग्यांचा मुद्दाच नव्हता. काही लोकांनी दंगली करण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या राज्यात काम होत आहे. यासंदर्भात एक राजकीय धोरणा जाहीर करा आणि संपूर्ण देशात ते लागू करा असे देखील ते म्हणाले.

हे देखील पाहा -

पुढे संजय राऊत म्हणाले की, मला वाटतं भोंग्यांचा मुद्दा संपला आहे. महाराष्ट्रात शांतता आहे. काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. पण राज्यातील जनतेनंच त्यांना करारा जवाब दिला आहे. भोंग्यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंनाच बसला आहे. भजन-किर्तन करणाऱ्यांना याचा धक्का बसला आहे. भोंग्यांच्या भूमीकेवर सर्वात जास्त नाराज हिंदु समाज आहे. हिंदु समाजात फुट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. पण तसं होऊ शकलं नाही असं संजय राऊत म्हणाले.

देशात महागाई इतकी वाढली आहे पण त्यावर भाजपचा एकही नेता बोलायला तयार नाही. आज देशासमोर महागाई हा सर्वात मोठा मुद्दा आहे.पण भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही. पंतप्रधानांना रशिया आणि युक्रेनची चिंता आहे त्यासंदर्भात ते मध्यस्ती करत आहेत. रशिया आणि युक्रेनचं त्यांचं ते पाहून घेतील. भारतीय महागाईचं युद्ध लढतायेत त्याचं काय. तुम्ही भोंग्यावर कसले बोलताय महागाईवर बोला. भोंग्यांवर बोलणं तुमचं काम नाही अशी टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT