Sanjay Raut on Dharmaveer 2 Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

Sanjay Raut on Dharmaveer 2: विधानसभा निवडणुकीपूर्वी धर्मवीर-2 सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र हा सिनेमा काढण्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर धर्मवीर वरून वादाचा नवा अंक सुरू झालाय.

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

आनंद दिघेंच्या आयुष्यावरील धर्मवीर 2 चा ग्रँड प्रिमीयर शो पाहिल्यानंतर आपण धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.

त्यानंतर धर्मवीरवरून वादाचा नवा अंक सुरु झाला. तर भाजपच्या मदतीने आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी 'मी नाही त्यातली कडी लाव आतली' नावाचा चित्रपट काढावा, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

धर्मवीर सिनेमातून आनंद दिघेंच्या आयुष्यासोबत एकनाथ शिंदेंच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. मात्र धर्मवीर 2 मध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

धर्मवीर-2 मध्ये नेमकं काय?

एकनाथ शिंदेंच्या बंडाचं कारण 'धर्मवीर'मधून स्पष्ट होईल. ठाकरे हिंदुत्वाला तिलांजली देत असल्याची मांडणीही चित्रपटात पाहायला मिळू शकतं. आनंद दिघेंच्या विचाराचा संदर्भ देत बंडाचं समर्थन केल्याचं पाहायला मिळू शकतं. आनंद दिघेंच्या कडवट हिंदुत्ववादी विचारांची मांडणीही या चित्रपाटात पाहायला मिळू शकते.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी धर्मवीर 2 प्रदर्शित करण्यात आल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा रंगलीय. ठाकरेंकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. त्याला आक्रमक प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंकडून निवडणुकीत धर्मवीर आनंद दिघेंच्या प्रतिमेचा वापर केला जाण्याची चर्चा रंगलीय. मात्र ही रणनीती किती यशस्वी ठरणार? यावरून विधानसभेचं दार ठाकरेंसाठी उघडणार की शिंदेंसाठी हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT