pune Shocking  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Shocking : पुण्यात खळबळ; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लॉजमध्ये केली आत्महत्या

pune police news : पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लॉजमध्ये आत्महत्या केली आहे.

Vishal Gangurde

सांगलीच्या पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं

पोलीस अधिकाऱ्याने पुण्यात केली आत्महत्या

पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ

अक्षय बडवे, साम टीव्ही

राज्याच्या पोलीस विभागातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने पुण्यातील एका लॉजमध्ये विष पिऊन जीवन संपवलं. पोलीस अधिकारी सांगलीच्या पोलीस विभागात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

सांगली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केली. सुरज मराठे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. शारीरिक व्याधीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजमध्ये पोलीस अधिकारी सूरज मराठे यांनी आत्महत्या केली. ते सांगली पोलीस दलातील तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या २५ वर्षांचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती. पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले. त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी शेवटची चिठ्ठी मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

SCROLL FOR NEXT