समीर वानखेडे म्हणाले, "माझ्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही" !  Saam Tv
मुंबई/पुणे

समीर वानखेडे म्हणाले, "माझ्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही" !

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी जात पडताळणी समितीला सांगितले आहे की, समितीने मागितलेले जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही.

वृत्तसंस्था

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी (Sameer Wankhede) मंगळवारी जात पडताळणी समितीला सांगितले आहे की, समितीने मागितलेले जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही. एससी प्रवर्गात (SC Category) नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्राचा वापर केल्याच्या आरोपाखाली वानखेडे यांच्यावर चौकशी करण्यात आली आहे.

मात्र, समितीने मागितलेली इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी आणखी मुदत मागितली आहे. 18 जानेवारी 2022 रोजी यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे, त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत ते सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.” असे वानखेडेचे यांचे वकील रामचंद्र राणे यांनी सांगितले आहे.

सुनावणीदरम्यान तक्रारदार अशोक कांबळे आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे वकीलही उपस्थित होते.

तर, “वानखेडे यांनी आणखी वेळ मागितला आहे आणि त्यांनी समितीला सांगितले की त्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही,” अशी माहिती अशोक कांबळे यांच्यासाठी असलेले वकील नितीन सातपुते यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. ते पुढे म्हणाले की, वानखेडे यांनी त्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याचे रेकॉर्डवरील समितीला कळवले असल्याने, आता या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचे अधिकार scrutiny committee आहेत. पुढे सातपुते यांनी माहिती दिली की, “जर वानखेडे यांनी वैधता प्रमाणपत्र दाखवले असते, तर हे प्रकरण या समितीच्या अखत्यारीत आले नसते, तर मुंबई उच्च न्यायालयात गेले असते.

हे देखील पहा-

दरम्यान, वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केल्यानंतर समितीसमोर याप्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या वर्षी ऑक्टोबरमध्ये समीर वानखेडे आणि त्याच्या टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक, ज्यांच्या जावयालाही एनसीबीने अटक केली होती, त्यांनी समीर वानखेडेवर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोप केला होता. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आणि नोकरी मिळवण्यासाठी तो अनुसूचित जातीचा असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. यानंतर, महाराष्ट्र सरकारच्या जात दक्षता समितीने समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या जात प्रमाणपत्रासंबंधीच्या आरोपांची चौकशी सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT