chhatrapati shivaji maharaj, udayanraje bhosale, yuvraj sambhajiraje chhatrapati, pimpri chinchwad saam tv
मुंबई/पुणे

Chhatrapati Shivaji Maharaj : संभाजीराजेंची उदयनराजेंना चपराक; मी जर तिथं असताे तर...

आज पिंपरी चिंचवड शहर बंद ठेवण्यात आले आहे.

गोपाल मोटघरे

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज हे पक्षा पलीकडचे आहेत. मी जर कुठल्या पक्षात असलो असतो आणि त्या पक्षात जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला असता तर मी विरोधी पक्षाच्या स्टेजवर गेलो असतो आणि तिथे सांगितलं असतं की शिवाजी महाराज यांचा अपमान झालाय.......! पक्ष गेला खड्ड्यात. त्या पक्षाची भूमिका देखील मी खड्ड्यात टाकली असती अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तसेच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही राज्यात सत्तेत असलेलं शिंदे फडणवीस सरकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांना चपराक लगावणारी आहे. पिंपरी चिंचवड शहर बंदच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी शहरात भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

संभाजीराजे छत्रपती म्हणाले आज पिंपरी चिंचवड बंद झाला आहे. उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकताे. बंद करून लोकांना वेठीस धरण्याची भूमिका माझी नाही. मात्र याचा सत्ताधाऱ्यांनी विचार करायला हवा. राज्यपालांचा प्रश्न अजूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथेच रखडत का ठेवला आहे ? असा सवाल देखील संभाजीराजेंनी केला आहे.

फडणवीस म्हणतात आम्ही तुमचा निरोप पोहोचवला. पण आमचा निरोप कुठे पोहोचवला आणि त्यानंतर काय कारवाई झाली हे आम्हाला तुम्ही का कळवत नाही ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असे देखील संभाजीराजेंनी (yuvraj sambhajiraje chhatrapati) नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT