Sambhaji Bhide Saam TV
मुंबई/पुणे

Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढल्या, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Vishal Gangurde

सचिन जाधव

Sambhaji Bhide News In Marathi

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही मार्गदर्शन बैठक घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही मार्गदर्शन बैठक घेणे संभाजी भिडे यांना चांगले महागात पडले आहे. यावरून पोलिसांनी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

संभाजी भिडे यांनी नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी सभा आयोजित केली होती.

पोलिसांनी या भिडे यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र, परवानगी नाकरल्यानंतरही सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आणि १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या सभेप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, बाळासाहेब नेवाळे, राहुल उंद्रे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत एअर हॉस्टेसची हत्या

मुंबईतील पवई परिसरात एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एअर हॉस्टेसची हत्या नेमकी कोणी केली, याचा उलगडा पोलिसांनी केली आहे. पवई पोलिसांनी या हत्येप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी सफाईच काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या मृत तरुणीचं नाव रुपल ओगरे असं आहे. मरोळ येथील एन जी कॉम्पलेक्समधील राहत्या घरी रुपलचा मृतदेह आढळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Case: रोहित आर्यप्रकरणात 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; थेट कार्यशाळेतील फोटो टाकले, अन् म्हणाला...

Bhakri Making Tips: भाकरी थापताना तुटते, फुगतच नाही? वापरा १ सोपी ट्रिक, भाकऱ्या होतील गोल अन् मऊ

'माझ्यासकट माझ्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न', उद्धव ठाकरेंना संशय

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दाखवला पुराव्याचा ढिगारा; विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT