साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण; गृहमंत्र्यांची पोलिसांवर कौतुकाची थाप Saam Tv News
मुंबई/पुणे

साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण; गृहमंत्र्यांची पोलिसांवर कौतुकाची थाप

याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.

रोहिदास गाडगे

पुणे: साकीनाका येथील बलात्कार (Sakinaka Rape Case) व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फास्ट ट्रॅकने पूर्ण केला आहे. या आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून ३४६ पानांची ही चार्जशीट आहे. याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे निर्भया पथक दक्ष आहे. या पथकाच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने उचललेले हे भक्कम पाऊल आहे.

दरम्यान मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड (khairani road) परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी साकीनाका पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटकही केली होती. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती समोर आली होती. आणि त्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू देखील झाला होता.

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार Sakinaka Rape Case होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिली होती, आणि तपास फास्ट ट्राकवर चालवून आरोपी कडक शिक्षा केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT