Mumbai Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport: बॅगेत बॉम्ब असल्याचं महिलेनं सांगितलं, अख्ख्या एअरपोर्टवर उडाला गोंधळ; आता आली पश्चातापाची वेळ

Mumbai Latest News: सहारा पोलिसांनी (Sahar Police) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) बॅग चेक इन दरम्यान एका महिलेने बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. यामुळे पोलिसांची एकच धांदल उडाली. पण महिलेने बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली. या महिलेला बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगणं महागात पडलं आहे. तिला सहारा पोलिसांनी (Sahar Police) अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर बॅग चेक इन दरम्यान रुची शर्मा नावाच्या एका महिला प्रवाशाने बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. चेक इन दरम्यान बोर्डिंग पास घेत असताना या महिलेने ही माहिती सांगितली. त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. बॉम्ब असल्याचे कळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर श्वान पथकाला बोलावून बॅगेची तपासणी करण्यात आली. यावेळी बॅगेत बॉम्ब नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेविरोधात कारवाई केली.

बॅगेत बॉम्ब असल्याची धमकीवजा खोटी माहिती देऊन मुंबई विमानतळावरील सार्वजनिक शांततेचा भंग करून भीतीदायक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सहारा पोलिसांनी या महिलेला अटक केली. या महिलेविरोधात पोलिसांनी भा दं वि कलम 336 आणि 505 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. एका दिवसातच पोलिसांनी महिलेविरोधात आरोपपत्र दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डोमेस्टिक प्रवासात 15 किलो अधिकतम वजनाची एकच बॅग घेऊन जायची परवानगी असताना रुची शर्माकडे एकूण 22 किलो वजनाच्या दोन बॅगा होत्या. जास्तीचे चार्जेस भरण्यास रुची शर्माने नकार दिला होता. त्यामुळे विमानतळावर वाद झाला होता. त्यामुळे तिने बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. तिच्या या अफवेमुळे एकच गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT