Sachin Waze ₹90,000 salary BMW Volvo Mercedes cars saam tv
मुंबई/पुणे

90,000 पगार, तरी BMW, Volvo, 2 Mercedes कुठून आले? 3 तासांच्या सुनावणीत न्यायमूर्तींचे सचिन वाझेंना धडाधड प्रश्न; जामिनावर काय निर्णय दिला?

Sachin Waze Bail Hearing: सचिन वाझेंच्या जामिनावर मुंबई हायकोर्टात तब्बल तीन तास सुनावणी झाली. ९० हजार रुपयांच्या पगारासह BMW, Volvo, दोन Mercedes आणि Toyota Land Cruiser Prado या गाड्यांबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित झाले.

Omkar Sonawane

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या जामिनासंदर्भात मुंबई हाय कोर्टात आज तब्बल तीन तास सुनावणी झाली. वाझेना विशेष एनआयए न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणावर आता 14 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाने सचिन वाझे यांच्या महागड्या गाड्यांबाबत प्रश्न उपस्थित केले.

वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक API पदावर असताना मर्सिडीजसारख्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करत असल्याचा उल्लेख एनआयएच्या युक्तिवादात करण्यात आला. यावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त करत API पदावरील अधिकाऱ्याकडे अशा प्रकारची महागडी गाडी असणे ही बाब लक्षवेधी असल्याचे निरीक्षण नोंदवले. कोर्टात वाझे यांच्या वापरातील पाच गाड्यांची यादीही सादर करण्यात आली. यामध्ये BMW, Volvo, दोन Mercedes आणि Toyota Land Cruiser Prado या वाहनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

तसेच वाझे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीही मर्सिडीजमधून जात असल्याचा उल्लेख सुनावणीदरम्यान करण्यात आला. वाझे यांचा सध्याचा मासिक पगार सुमारे 90 हजार रुपये असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने 29 सप्टेंबर रोजी वाझेंना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एनआयएने या निर्णयाला मुंबई हाय कोर्टात आव्हान दिले. हाय कोर्टाने जामिनाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. आजच्या सुनावणीनंतर ही स्थगिती कायम ठेवण्यात आली असून, पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIR: इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान ४२ निवृत्त न्यायाधीशांचे SIR ला समर्थन, थेट देशाच्या नावाने लिहिलं खुलं पत्र

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

SCROLL FOR NEXT