Sachin Waze  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कोर्टाकडे अजब मागणी; अर्ज केला दाखल

Sachin Waze News : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब स्फोटक ठेवल्याचा आरोप देखील सचिन वाझेवर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

मुंबई पोलीस दलातील बडतर्फ माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे एका अजब मागणीमुळे चर्चेत आला आहे. सचिन वाझेने कोर्टात अजब मागणी केली आहे.

सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहातील आहे. तेथील मांजरीचं पिल्लू दत्तक घेण्यासाठी सचिन वाझेने विशेष एनआयए कोर्टात अर्ज केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तळोजा कारागृहात एक झुमका नावाचं मांजरीचं पिल्लू आहे. ते खूप अशक्त असून त्याचा सांभाळ करण्याची गरज असल्याचं अर्जात म्हटल्याची माहिती समोर येत आहे.

आपण प्राणी मित्र असून याआधी देखील भटक्या कुत्र्यांना आणि मांजरांना वाचवून त्यांचा सांभाळ केल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहे. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

सचिन वाझेला सध्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब स्फोटक ठेवल्याचा आरोप देखील सचिन वाझेवर आहे. (Latest Marathi News)

याशिवाय मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही त्याचा हात असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात सचिन वाझे एनआयए कोठडीत आहे. काल एनआयए विशेष कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी त्याने मांजरीचं पिल्लू दत्तक घेण्याची मागणी केल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT