बदलापूर शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या
Next Gen Reporter सानवीने ‘रस्ते बनवणाऱ्या काकांना पनिशमेंट द्या’ म्हणत प्रशासनाला थेट सवाल केला
सानवीने रस्त्यांवरील खड्ड्यांना ‘झिरो’ म्हणत परीक्षेतील गुणांची मजेशीर तुलना केली
बदलापूर शहरातील खराब रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडली असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच प्रश्नाकडे आता एका चिमुकलीनेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. साम टीव्हीच्या छोट्या रिपोर्टरने याचा आढावा घेत रस्ते बनवणाऱ्या काकांना शिक्षा कधी होणार असा प्रश्न शासनाला केला आहे. तसेच तिने या खड्ड्यांना झिरो म्हणत परीक्षेतील गुणांची मजेशीर तुलना केली.
Saam TVच्या विशेष Next Gen Reporter सेगमेंटमध्ये बदलापूरची चिमुकली सानवी हिने आपल्या परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा मांडला. रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यातून होणारा त्रास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावर सानवीने थेट सवाल उपस्थित केले.
“रस्ते बनवणाऱ्या काकांना पनिशमेंट द्या,” अशी निरागस पण तितकीच बोचरी मागणी सानवीने केली. तिने वृत्तांकन करताना म्हटले आहे की, या रस्त्यावर किती झिरो म्हणजेच खड्डे आहेत. एवढे झिरो मला परीक्षेत मिळाले असते तर, माझ्या आई वडिलांनी मला शिक्षा केली असते. मग या रस्ते बनवणाऱ्या काकांना कोण शिक्षा देणार? रस्ते बनवणारे काका कॉपी करून पास झाले का? असा सवाल या चिमुकलीने केला आहे. तिच्या या वक्तव्यातून खराब रस्त्यांबाबत नागरिकांच्या मनात असलेला संताप आणि अपेक्षा स्पष्टपणे दिसून आली.
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, Next Gen Reporterच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या परिसरातील प्रश्न स्वतःच्या शब्दांत मांडत आहेत. त्यामुळे चिमुकल्या सानवीचा हा सवाल केवळ एका रस्त्याचा प्रश्न न राहता, शहरातील रस्त्यांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करणारा ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.