Hapus Amba, Ratnagiri, Mumbai, APMC Market
Hapus Amba, Ratnagiri, Mumbai, APMC Market saam tv
मुंबई/पुणे

Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे / अमाेल कलये

Hapus Amba : रत्नागिरीत कर्नाटक येथील आंब्याची काेकणातील हापूस आंबा (alphonso mango) याच्या नावाखाली विक्री केली जात हाेती. याची माहिती स्थानिक अंबाबागातदारांना मिळाली. त्यामुळे आंबा बागायतदार नाराज झाले. त्यांनी कर्नाटकी आंब्याची (karnataka mango) विक्री करणा-यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान यानंतर काही विक्रेत्यांनी कर्नाटकी आंबा काेकणचा हापूस आंबा म्हणून विकणार नाही असे सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला. (Maharashtra News)

सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. बाजारात कोकणचा हापूस आंबा आणि कर्नाटकी आंब्याची आवक होत आहे. अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातली हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. दूसरीकडे कर्नाटकी आंब्याची आवक वाढल्याचे पहायला मिळतंय. यामुळे ग्राहकांना कर्नाटकी आंबा हा कोकणातील हापूस आंबा असल्याचं भासवून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

दरम्यान वाशी येथील एपीएमसीतील संजय पिंपळे यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधत काेकणातील हापूस आंबा आणि कर्नाटकी आंबा यामधील फरक समजून घेतला. पिंपळे म्हणाले या दाेन्ही आंब्यात साम्य असलं तरी मोठ्या प्रमाणावरती फरक देखील आहे. दोन्ही आंबे दिसायला साधारण सारखेच असेल तरी कोकणातील हापूस आंब्याची साल बारीक, आतून केसरी आणि चवीला साखरे सारखा गोड असतो. पिंपळे यांनी कर्नाटकी आंब्याची साल जाड, आतून पिवळा आणि चवीला पांचट असतो असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशाच; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Relationship Tips : रागीट पार्टनरला 'या' टिप्सने हँडल करा; दुसऱ्या दिवशी स्वत: सॉरी म्हणेल, प्रेम आणखी वाढेल

Satara News: दुर्दैवी! धावत्या इलेक्ट्रिक स्कुटीवर वीज पडून मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू; २ जखमी

Loksabha Election: संभाजीनगरमध्ये सेनाविरूद्ध सेना; ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते भिडले

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची तयारी पूर्ण; शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT