Rupali Chakankar : चंद्रकांत पाटील बोलतात कमी आणि बरळतात जास्त - रुपाली चाकणकर Saam TV
मुंबई/पुणे

Rupali Chakankar : चंद्रकांत पाटील बोलतात कमी आणि बरळतात जास्त - रुपाली चाकणकर

'समोरच्याला विरोध करता आला नाही की, त्यांच्या घरच्या लोकांवरती उतरायचं ही भाजपची संस्कृती चंद्रकांत दादांनी परत एकदा दाखवली '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : 'चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) जेव्हा एखादं स्टेटमेंट करतात तेव्हा ते बोलतात कमी आणि बरळतात जास्त.' अशी घणाघाती टीका रुपाली चाकणकर यांनी पाटील यांच्यावरती केली आहे. तसंच, 'तारीख पे तारीख पे देणारे चंद्रकांत पाटलांनी 10 मार्चला भाजप सत्ता स्थापन करणार असं जेव्हा वक्तव्य केल त्याच्या पुढल्या क्षणीच ते म्हणतात की आपण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून मी असं बोललो.'

त्याच्यामुळे पाटील यांनी बुद्धीचा व्यवस्थित वापर करावा तसंच समोरच्याला विरोध करता आला नाही की त्यांच्या घरच्या लोकांवरती उतरायचं ही भाजपची संस्कृती चंद्रकांत दादांनी परत एकदा दाखवली असल्याची टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. (State Women's Commission Chairperson Rupali Chakankar )

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकरांचे घराणे हे सुसंस्कृत आहे. मी आता त्यांच्या घरात जाऊन विचारतो की महिलांना वाईन (Wine) चालणार आहे का? रुपालीताईंनी हा शोध लावला की महिलांनी वाईनला विरोध केला नाही असं वक्तव्य केलं होतं या त्यांच्या वक्तव्यावरतीच चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बुद्धीचा आवाका वाढवा

त्या म्हणाल्या माझी पत्रकार परिषद आपण परत एकदा नीट ऐका पहा यामध्ये पत्रकारांनी प्रश्न काय विचारला त्याला उत्तर काय दिलं ते पाहून आपण प्रतिक्रिया द्या; फार उतावळेपणा करायची गरज नाहीये आपल्या हातामध्ये जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित सदुपयोग करा बुद्धीचा आवाका वाढवा आणि मग प्रश्नांची उत्तरे द्या! असा घणाघाती टोला रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

Maharashtra News Live Update: पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक

Nashik Fort : ४,८२९ फूट उंचीवर वसलेले नाशिकमधील ऐतिहासिक ठिकाण, किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य मन जिंकून घेईल

Badlapur Tourism: हिरव्यागार टेकडीवर वसलंय शिवकालीन जागृत खंडोबा मंदिर; भाविकांसाठी श्रद्धेचं अनोखं स्थान

SCROLL FOR NEXT