Crime New In Marathi Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा अफवेचा फोन; हाजीअली येथे अतिरेकी येणार असल्याची अफवा

Rumor call again to Mumbai Police: २० ऑगस्ट २०२२ ला देखील मुंबई पोलिसांना धमकीचा मॅसेज आला होता. यात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी अज्ञातांनी दिली होती.

सूरज सावंत

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा एका अज्ञात इसमाकडून अफवेचा (Rumor) फोन आला आहे. फोनवरील व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. (Mumbai Latest News)

पोलिसांनी (Mumbai Police) त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. सध्या मुंबई पोलिसांना अशा अफवांचे फोन येण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

२० ऑगस्ट २०२२ ला देखील मुंबई पोलिसांना धमकीचा मॅसेज आला होता. यात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी अज्ञातांनी दिली होती. त्यावेळीही पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला होता, मात्र हा फोनकॉल देखील खोटा आणि अफवेचा होता.

पोलिसांना अनेकदा असे फोन येत असतात. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून तात्काळ सुरक्षेचा आढावा घेतला जातो, तपासणी केली जाते. मात्र, नंतर अशा बातम्या खोट्या असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?

Balushahi Recipe: भाऊबीज स्पेशल मिठाई, घरच्या घरी तयार करा हलवाईसारखी गोड बालुशाही, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

SCROLL FOR NEXT